वडोद बाजार येथील शेकडो गायरान कास्तकऱ्याचा प्रशासनाला इशारा
फुलंब्री ; तालुक्यातील मौजे वडोद बाजार येथील गायरान गट नं. २९६ आणि २९८ मध्ये ४० वर्षा पासून अतिक्रमण करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कास्तकारी गायरान धारकांच्या जमीनीवर इतर शासकिय योजना न राबविता जमिन नावावर करा या मागण्यासाठी २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय वडोद बाजार येथे काळ्या फिती लावून ध्वज दिनी निदर्शने व त्यानंतर ही न्याय न मिळाल्यास ग्रा पं कार्यालय येथे सामुदाहीक आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी,जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी येथे येणार आहे.
