रयत शेतकरी संघटना आक्रमक, संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख
फुलंब्री (प्रतिनिधी- हेमंत वाघ) : जिल्ह्यातील फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सरकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना संघटनेचे भीतीने निवेदन सादर पंधरा ते वीस वर्षापासून बंद असून धुळ खात पडलेला आहे जमीन कारखान्याकडे असून सध्या कारखान्यावर प्रशासक नेमणूक आहे देवगिरी सहकारी साखर कारखान्यावर बँकेचे कर्ज होते जमीन विक्री करून समृद्धी महामार्ग मध्ये कारखान्याची जमीन भूसंपादन झालेल्या जमिनीच्या पैशातून बँकेने कर्ज जमा करून प्रशासकीय यांनी कर्मचारी व अधिकारी यांच्या थकीत पगार घेऊन कारखान्याकडे सध्या जमीन व पैसा आहे कारखाना सुरू झाल्यास फुलंब्री तालुका व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होऊन शेतकरी अडचणीतून दूर होईल तसेच शेतकरी शेतमजूर व्यापारी ऊसतोड कामगार कारखाना कामगार यांना रोजगार मिळेल ज्या शेतकऱ्यांनी आपल्या मुलाला कारखान्यात नोकरी लागावी म्हणून कवडीमोल भावामध्ये शेतकऱ्यांनी कारखाना उभा राहण्यासाठी आपल्या जमिनी दिल्या परंतु कारखाना बंद झाल्यामुळे शेतकऱ्याचे मुले कारखाना बंद रोजगार पासून वंचित आहे या कारखान्याकडे सतत दुर्लक्ष केल्या जात आहे.

कारखाना सुरू झाल्यास सर्वांना याचा फायदा होईल संघटनेचे निवेदनाचे दखल न घेतल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल
निवेदनावर संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष मराठवाडा अध्यक्ष त्रिंबक नागरे जिल्हाध्यक्ष हरिदास सराटे अध्यक्ष सुरेश नागरे अल्पसंख्यांक अध्यक्ष रवी पटेल उपाध्यक्ष सय्यद मझर गुलाम रसूल पटेल मराठवाडा उपाध्यक्ष पुंडलिक कदम जिल् सरचिटणीस मुक्तार शेख गजानन पाटील जिल्हा युवक अध्यक्ष रईस पटेल.