फुलंब्री (प्रतिनिधी- हेमंत वाघ) : फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे सुनील गाडेकर यांनी आयडिया इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या सीएसआर फंडातून निधोना ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका भेट दिली. या प्रसंगी आमदार अनुराधा चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, जिल्हा सरचिटणीस ऐश्वर्या अभिषेक पा. गाडेकर, तालुकाध्यक्ष सांडू जाधव, बाजार समितीचे सभापती डॉ. राधाकिसन पठाडे,

मंगलताई वाहेगावकर, जितेंद्र जैस्वाल, शिवाजी पाथ्रीकर, संजय त्रिभुवन, सर्जेराव मेटे यांच्यासह आयडिया इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिकचे संचालक सुनील गाडेकर, सुभाष सारडा, रवी सिंग, गोपाल महाजन, सुरेश मते, सरपंच सुमनताई राऊतराय, उपसरपंच सुभाष राऊतराय, चेअरमन अशोक गाडेकर, दादाराव राऊतराय, रमेश गाडेकर, कौतिक राऊतराय आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शरद गाडेकर, अवचित राऊतराय यांनी केले. आभार समाधान वाघ यांनी मानले.