पैठण -; २६/११ हल्ला शहीद दिनी मंगळवार रोजी पैठण पोलिस ठाणे येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेवटचे वृत्त हाती आले असता एकूण ३४ रक्तदात्यानी रक्तदान केले आहे रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान या म्हणीप्रमाणे २६ /११ च्या हल्ल्यात शहीद जवानांना व ज्ञात अज्ञात नागरिकांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी सांगितले कि रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करावे असे आवाहन देखील यावेळी पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी केले…

..रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ठाण्यातील सर्व अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले