छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : इंदिरा नगर वार्ड क्रमांक ५९ आणि न्यू बायजी पुरा वार्ड क्रमांक ६० येथील नागरिकांनी पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या समारंभाचे आयोजन भरत लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या प्रवेश सोहळ्यात चिमणे मामा, राजू दांडगे, विजय मणियार, गणेश शहाणे, संतोष साखरे, शिवाजी कदम, पारस निकम, सुनील निकम, आसाराम अडगळ, संतोष अडगळ, सुखदेव पोपळघट, दिनेश विसपुते, संजय कदम, गजानन शिंदे, बाळू शिंदे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिकांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपला पाठिंबा व्यक्त केला.

अतुल सावे यांच्या नेतृत्त्वाखाली मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनसेवेसाठी सक्रिय राहण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला. हा सामूहिक प्रवेश फक्त एका पक्षातील सामील होण्यापेक्षा एका विचारधारेशी बांधिलकी जोडणारा आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी योगदान देण्याच ठरला आहे.