आर.वाय.पी.कला महाविद्यालय बिडकीन व विहामांडवा येथे मराठी विषयी व्याख्यान !

आर.वाय.पी.कला महाविद्यालय बिडकीन व विहामांडवा येथे मराठी विषयी व्याख्यान !

बिडकीन (प्रतिनिधी निर्मला भालेराव) : आज दि.23 आक्टोबर 2024 रोजी कला महाविद्यालय बिडकीन येथे मराठी विभाग व भाषा वाड्मय यांच्या संयुक्त विद्यमाने ” अभिजात मराठी आणि मातृभाषेचे भवितव्य ” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून आर.वाय.पी.कला महाविद्यालय विहामांडवा येथिल मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितिन आहेर होते. प्रास्ताविक मराठी विभाग व भाषा वाड्मय मंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद ठोकळे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी 2012 पासून रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. या समितीने अभ्यासपूर्ण अहवाल केंद्र शासनाला सादर केला त्यामुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला याचा सर्वांना फायदा होईल असा आशावाद व्यक्त केला.अतिशय दमदार सूत्रसंचलन डॉ. अर्चना काटकर मॅडम मराठी विभाग प्रमुख यांनी केले. ‘अभिजात मराठी आणि मातृभाषेचे भवितव्य ‘ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते डॉ. संजय शिंदे यांनी अभिजात मराठी भाषा म्हणजे काय ? त्याचे निकष काय होते ? त्यासाठी राज्यसरकारने निवडलेल्या समितीने कसा अभ्यासपूर्ण अहवाल दाखल केला. याविषयी सखोल मार्गदर्शन केले.अगदी दोन हजार वर्षापूर्वी होऊन गेलेल्या महाकवी गुणाढ्य यांचा संदर्भ देत. मराठी भाषेचे अस्तित्व हे स्वतंत्र दर्जाचे असून वैदिक पूर्व भाषेतून संस्कृत भाषेचा उदय सांगितला जातो.त्याच पद्धतीने मराठी भाषा सुद्धा संस्कृत इतकीच प्राचीन असल्याचे अभ्यासपूर्ण पुरावे. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे व त्यांच्या निवड समितीने अहवालात स्पष्ट केले होते.

तसेच शिलालेख, ताम्रपट व इतर भाषेतील मराठी भाषाविषयक प्राचीन पुरावे जोडून अगदी एक वर्षात हा अहवाल 12 जुलै, 2013 मध्ये शासनाला सादर केला. आणि केंद्रशासनाने तो स्वीकारून सविस्तर अभ्यासकरून अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचे 03 आक्टोंबर, 2024 रोजी घोषित केले. आता मराठी भाषेला सुवर्णकाळ यायला उशिर लागणार नाही. लवकरच देशाच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषेची धून गुंजेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याची गरज नाही तर भाषेचा उत्कर्ष काळ समिप आणण्यासाठी चिंतन करण्याची मात्र गरज आहे. मराठी भाषा परंपरेने समृद्ध असून खूप ज्ञानाचा भांडार हा लोकसाहित्यात दडलेला आहे. तो आता वेगवेगळ्या विद्यापीठातील अध्यासन केंद्राद्वारे अभ्यासण्याठी सोयीचे झाले आहे. प्रतिवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कारासह मराठी माणसांचा सन्मान होईल. व भाषा अधिक गतीमान व विकसित होईल हा आशावाद व्यक्त केला. त्याचबरोबर भाषा वाड्मयमंडळातर्फे भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. तदनंतर डॉ. संजय शिंदे स्वलिखित ‘ बंधो ‘ आणि ‘ तुझ्यासह तुझ्याविना ‘ असे दोन कवितासंग्रह महाविद्यालयास भेट दिले. प्रबोधनपर एक कथा आणि कविता म्हणून व्याखानाची सांगता केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नितीन आहेर यांनी अभिजात मराठी भाषेचा गोडवा आणि मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे भविष्यामध्ये भाषेचे जतन करण्यासाठी व भाषेचे संशोधन करण्यासाठी मदत होईल असा आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक , प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभार डॉ. युसुफ पठाण सरांनी केले . तदनंतर महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *