गंगापूर ; (कैसर जहुंरी) : जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने दारूच्या नशेत शाळेतील ४ विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या आरोप करीत महंमदपुर ग्रामस्थांनी मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची मागणी केली असुन मुख्याध्यापकाचे रक्त तपासणीसाठी पाठवले आहे.या शिक्षकांनी शाळेलाच बनवला दारुचा आड्डा जिल्हा परिषद शाळेच्या दिपक सुलाने या मुख्याध्यापकाने दारूच्या नशेत शाळेतील ४ विद्यार्थ्यांना मारहाण केल्यामुळे महंमदपुर ग्रामस्थांनी शुक्रवारी मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची मागणी केली. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी महंमदपुर ग्रामस्थ शिल्लेगांव पोलिस स्टेशनला आले; मात्र, पोलिसांनी जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक दिपक सुलाने याचे रक्त नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र लासुरस्टेशन येथे दिले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महंमदपुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक सुलाने यांनी शुक्रवारी १८ आक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता शाळेतील विद्यार्थ्यांनींना दारु पिऊन मारहाण केली.

त्यातील काहींच्या अंगावर वळ उठले असून घरी गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर महंमदपुर ग्रामस्थ शाळेजवळ जमा झाले व त्यांनी केंद्रप्रमुख संजीव बोचरे यांना फोन करून माहिती दिली असता बोचरे बाहेर असल्याने त्यांनी विठ्ठल नरवडे मुख्याध्यापक यांना महंमदपुर येथे पाठवले असता ग्रामस्थांनी सुलानेला तातडीने निलंबित करण्याची मागणी करत गुन्हा दाखल करा अशी मागणी लावून धरल्याने नरवडे यांनी शिल्लेगांव पोलीसांना सांगुन रक्त नमुने तपासणीसाठी लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले परंतु सुलाने याला राजकीय अभय असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सुत्रांकडून कळाले. या नंतर यांच्या संदर्भातील अहवाल गटविकास अधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवला जाईल, असे सांगितले; मात्र, या आश्वासनाने समाधान न झालेले ग्रामस्थ थेट शिल्लेगांव पोलिस स्टेशनला आले. व मुख्याध्यापक सुलाने यांच्याविरोधात बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा व बाल शिक्षण हक्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु काही राजकीय हस्तक्षेप केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे. महंमदपुर येथे जिल्हा परिषदची पाचवी पर्यंत शाळा असून या शाळेत चार विद्यार्थ्यांसाठी तिन शिक्षक आहे यात दोन बेवडे शिक्षक असुन यांनी शाळेलाच दारुचा अड्डा बनवला आहे.अशा बेवड्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.