गंगापुर (प्रतिनिधि : कैसर जहुटी ); गंगापुर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वैजापूर विधानसभा मतदारसंघाचा अनुषंगाने गंगापूर तालुक्यातील ५३ गावाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तसेच प्रचाराच्या अनुषंगाने कार्यालयाचे उद्घाटन आज दि.१८ ऑक्टोंबर रोजी संपर्कप्रमुख विलास जाधव,मा.बांधकाम सभापती अविनाश गलांडे,उपजिल्हाप्रमुखलक्ष्मण सांगळे, नगरअध्यक्ष शिल्पा परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. गंगापुर शहरातील गंगापूर वैजापूर मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तसेच प्रचाराच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी तालुकाप्रमुख सुभाष कानडे

,अंकुश सुभ,अकिल शेख,पांडुरंग कापे,संकेत वाणी,सुदाम भडके,हिकमत काक,नागेश चौधरी,बद्रीनाथ बाराहाते,भानुदास पवार,श्रीलाल गायकवाड,शिल्पा परदेशी,वैशाली पवार,रुक्मिणी राजपूत,सचिन चिंतामणी, गणेश टेमकर,अय्युब पठाण,जावेद पटेल,अजित राजपुत आणि पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.