छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : भाजप प्रणित संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित १६ ऑगस्ट रोजी सविधान जागर यात्रा नावाचा कार्यक्रम आंबेडकरनगर या ठिकाणी होत असून हा कार्यक्रम घेण्यामागे भूमिका स्पष्ट करावी असा प्रश्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना ते असेही म्हणाले संविधान बदलण्याची भाषा करणारे आणि जंतरमंतरवर संविधान जाळणारे संविधान जागर करत असतील तर ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे. त्यांनी नौटंकी बंद करावी.

भारतीय संविधानावर भाजपचे प्रेम असेल तर त्यांनी हा संविधान जागर कार्यक्रम आर एस एस चे मुख्य कार्यालय नागपूर येथे ठेवावा. नसता मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम घ्यावा आमचा त्यांना पाठिंबा असेल.. असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात )गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले आहे.