छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्या महिलांना प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचता आले नाही त्यांनी रविवारी मध्य विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार प्रदीप जैस्वाल यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. आणि शासनाचे आभार मानले. यावेळी आमदार
प्रदीप जैस्वाल यांनी आपल्या लाडक्या बहिणींना भेट म्हणून साडी दिली. आणि हे सरकार महिला सक्षमीकरणासाठी सदैव प्रयत्नशील राहील

अशा शब्दात आमदार प्रदीप जैस्वाल यांनी लाडक्या बहिणींना विश्वास दिला. यावेळी शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत, उपशहरप्रमुख अमोल खडसे, रमेश खरात आणि महिला आघाडीच्या शाखाप्रमुख राऊत ताई उपस्थित होत्या.