पुरस्कार कार्य करण्याची प्रेरणा देतात समाजसेवक यांच्या सामाजिक कार्याची हि कौतुकाची थाप आहे त्यांचा हा १०१ वाघ पुरस्कार आहे त्यांनी तो पुरस्कार माणुसकी समुहात अर्पण केला आहे
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) :: सचिन भंडारे / निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठानच्या वतीने,महाकवी वामनदादा कर्डक आणि शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे यांच्या जयंतीनिमित्त,या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून करून करण्यात आली.या कार्यक्रमाला मा.विजयकुमार गवई साहेब न्यायाधीश,प्रा.यशवंत खडसे, यशवंत खडसे,जेष्ठ साहित्यिक,गौतम पातारे पोलीस निरीक्षक,बालाजी सोनटक्के सहाय्यक पोलिस आयुक्त,रविंद्र जोगदंड, रंजना भोसले,अंबादास लंगडे आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यापैकी सु-लक्ष्मि बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सुमित पंडित यांच्या कार्यकर्तुत्वाचा सन्मान करून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रतनकुमार साळवे संपादक – दैनिक -“निळे प्रतीक ” यांनी केले होते. यावेळी समाजसेवक सुमित पंडित यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ते करीत असलेल्या रजंल्या गांजल्याची सेवा खरचं समाजापुढे वाखाडण्याजोगी आहे, रस्तावर फिरणाऱ्या मनोरुग्णांची दाढी केस कापून स्वच्छ अंघोळ घालुन त्यांना मनोविकृती रुग्णालयात कागदोपत्री पुर्तता करुन उपचारासाठी दाखल करतात,शासकीय रुग्णालयात गरजु रुग्णांना अर्ध्या रात्री मेडिकल साहित्य,भोजन,रक्त,पुरविण्यात ही जोडी देवदुतासारखी मदतीला धावुन जाते,बेवारसांचे अत्यंविधी सुध्दा हे दापत्य माणुसकी समुहाच्या माध्यमातून करतात, सुमित यांची व पत्नी पुजा पंडीत सध्या संभाजीनगर येथे रोडवरील बेवारस अवस्थेत सापडलेल्या वृध्दाचा वृध्दाश्रमात सांभाळ करते,

जटवाडा रोड येथे माणुसकी वृध्द सेवालय देखील वृध्दाच्या सेवेसाठी गेल्या २ वर्षांपासून मदतकार्य करते,व वृद्ध आश्रयासाठी दानातुनन घेतलेल्या ५ गुठ्ठे जागेवर सध्या लोकवर्गणीतून बांधकाम सुध्दा माणुसकी टिम काम करत आहे म्हणूनच त्याच्या या सामाजिक कार्याचा उल्लेख करित,त्यांचा सह कुटुंबासह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आहे, ह्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे च्या हस्ते मोठ्या थाटात हा सोहळा दिनांक – १५ ऑगस्ट २०२४ गुरुवार, दुपारी ०१:०० वाजता ठिकाण : मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र. छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला.या आधी सुमित पंडित यांना विविध १०० पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा हा १०१ वा पुरस्कार आहे.ह्या पुरस्काराने सुमित पंडित यांचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे.सुमित यांनी हा पुरस्कार माणुसकी समुहास समर्पित केला आहे.