जिल्हा परिषदेसमोर ३ दिवस आमरण उपोषणानंतर संबधितावर कार्यवाहीचे संकेत
सिल्लोड ( प्रतिनिधी ) : सिल्लोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत वडाळा येथील ग्रामसेवक सरपंच आणि सदस्य यांनी नोकरीचे खोटे अमिष दाखवुन काही महिने काम केल्यानंतर कामावरुन कमी करून बनावट दस्त तयार करणाऱ्या या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत या मागणी साठी सदर तरुणाने जि प समोर १४ ऑगस्ट ते १६ पर्यंत अमरण उपोषणाला केल्यानंतर नोकरीच्या नावाखाली लुट झालेल्या वडाळा येथील तरुणांला उपोषणा नंतर कार्यवाहीचे लेखी पत्र देण्यात आले .जिल्हा परिषदेसमोर ३ दिवस आमरण उपोषणानंतर संबधितावर कार्यवाहीचे संकेत दिले आहेत . फसगत झालेला तरुण आजीनाथ आवडाजी बिडवे रा. वडाळा ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की दिनांक १४/१०/२०२१ रोजी ग्राम पंचायत कार्यालय वडाळा येथे मी आजार असल्याने माझ्या जागेवर माझ्या मुलीची नियुक्ती करण्याची विनंती माझे वडील आवडाजी बिडवे यांनी केली होती त्यानंतर ग्राम पंचायत वडाळा यांनी दिनांक २०/१०/२०२१ रोजी झालेल्या मासिक मिटींग मध्ये ग्राम पंचायत शिपाई पदाच्या ठरावा बाबत इंदूबाई भाऊसाहेच शेळके यांनी (आजीनाथ आवडाजी बिडवे) यांची नियुक्ती करण्याचा ठराव सर्वांनी पास केला व नंतर दोन महिन्यात पगार देऊन नंतर राजकिय परत कामावरून कमी करून फसगत केली होती . या सर्व कारणासाठी ग्राम पंचायत, ग्रामसेवक व्ही. जी. तवर, सरपंच यशवंतराव पुजांजी भिवसने, ग्राम पंचायत सदस्य नवनाथ डाखोरकर, पुष्पाबाई विष्णु पांडे, इंदूबाई भाऊसाहेब शेळके, रोहिणी योगेश शेळके, वसंतराव प्रभत शेळके, रोहिणी नवनाथ डाखोरकर, यांनी ग्राम सेवक यांच्या मार्फत व गटविकास अधिकारी, सिल्लोड यांना देण्यासाठी रोख रक्कम ३,००,०००/- (अक्षरी तीन लाख रुपये) घेतले होते. त्यानंतर दि. २६/०१/२०२२ रोजी अचानक मासिक मिटींग सरपंच यशवंता भिवसने यांच्या अध्यक्षतेखील घेऊन ठराव क्रमांक ६ प्रमाणे नवनाथ डाखोरकर यांनी शिपाई आवडाजी बिडवे यांच्या जागी त्यांचा मुलगा आजीनाथ आवडाजी बिडवे यांना जे प्रस्तावित केले .

त्यानंतर कोणतेही कारण न दाखवता मला काम बंद करण्याचे तोंडी सांगण्यात आले. जे बेकायदेशीर होते यावरुन नोकरीच्या नावाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती, सिल्लोड आणि ग्रामसेवक तवर यांच्यासह ग्राम पंचायत कार्यालय वडाळा येथील सरपंच व सदस्य यांनी माझी नोकरीचे अमिष दाखवुन काही महिने नोकरी केल्यानंतर फसवणुक केली आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी पंचायत, सिल्लोड व ग्रामसेवक तवर ग्राम पंचातय कार्यालय, वडाळा यांच्यासह ग्राम पंचायत लोकप्रतिनिधी यांच्या विरुध्द पोलीस गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी . अशी विनंती करत १४ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती अखेर ३ दिवस उपोषणा नंतर सदर तरुणाला संबंधितावर योग्य कार्यवाही करणार असल्याचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी भोकरे यांनी शिष्ट मंडळाला दिले व संबंधितावर योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यात येईल असे लेखी पत्र डॉ ओ आर रामावत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जि प छत्रपती संभाजी नगर यांचे पत्र संजय दारवंटे (सहाय्यक प्रशासन अधिकारी) जि.पि.छ. संभाजीमनर व ए.एस. गाडेकर विस्तार अधिकारी ( वर्ग १) पंचायत समिती सिल्लोड यांच्या मार्फत उपोषणाला बसलेल्या अजिनाथ बिडवे यांना दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले .