भारत-बांगलादेश सीमेवरुन घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय लष्कराच्या कारवाईत घुसखोर ठार
कोलकत्ता : भारत आणि बांगलादेश सीमवेर सध्या हायअलर्ट आहे. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले होते. इतकंच नाही तर त्यांना स्वरक्षणासाठी देश देखील सोडावा लागला होता. त्यानंतर भारत आणि बांगलादेश सीमेवर हायअलर्ट घोषित करण्यात आला होता. कारण बांगलादेशमधून घुसखोरीचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. या दरम्यान पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर सोमवारी मध्यरात्री विडी पानांची तस्करी करण्याचा प्र पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीरपणे घुसला होता. त्यानंतर पश्चिम बंगालमधून बांगलादेशात बिडीची पाने घेऊन जाण्याच्या प्रयत्नात तो बीएसएफने केलेल्या कारवाईत तो ठार झाला.बीएसएफ जवानांनी त्याला रोख चा प्रयत्न केला

. तेव्हा त्याने त्याच्या साथीदारांसह बीएसएफ जवानावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. स्वसंरक्षणार्थ गोळीबारात एक तस्कर ठार झाला, बाकीचे दाट झाडी आणि अंधाराचा फायदा घेत बांगलादेशात पळून गेले. बांगलादेशी तस्कर ठार झाल्याची घटना बऱ्याच दिवसांनी समोर आली आहे.बीएसएफने सांगितले की, तपासादरम्यान मृत बांगलादेशी तस्कराचे नाव अब्दुल्ला असल्याचे समोर आले आहे. तो बांगलादेशातील चापैनवाबगंज जिल्ह्यातील सीमेवरील ऋषीपाडा गावचा रहिवासी होता. आंतरराष्ट्रीय सीमेपासून साडेचार किलोमीटर अंतरावर ऋषीपाडा गाव बांगलादेशात आहे. मृत तस्कर बॉर्डर गार्डने बांगलादेशचा सुरक्षा घेरा ओलांडून बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. येथून तो विडी बनवण्यासाठी पाने घेऊन बांगलादेशला जात होता. काही हजार रुपये किमतीची ही पाने त्याने चार-पाच बॅगांमध्ये भरली होती.