छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी). : स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर सोयगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने न्याय मिळाला नाही म्हणून अंगावर डिझेल होतं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानाने मोठी जीवितहानी टळली. सोयगाव तालुक्यातील घोरपड येथील शिवारामध्ये mseb च्या चुकीमुळे शॉर्टसर्किट झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते.
mseb च्या चुकीमुळे हे नुकसान झाले असल्याने mseb ने नुकसान भरपाई द्यावी ही मागणी केलेली होती. मात्र mseb ने हात वर करत जबाबदारी झटकल्याने आदित्य श्रावण गायकवाड या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय येथे न्याय मिळावा अशी मागणी केलेली होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणताच प्रतिसाद न दिल्याने सदर शेतकऱ्यांने स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिसांनी धाव घेत शेतकऱ्यांला ताब्यात घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. यावेळी सदर शेतकऱ्यांसोबत सुनील सनान्से, प्रसाद वराडे, उपस्थित होते.