पैठण शहर परिसरातील मुख्य व प्राचीन इतिहास असलेली बारा शिवालये व परिसर पहाटेपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी भक्तांच्या लांब रांगा!

पैठण शहर परिसरातील मुख्य व प्राचीन इतिहास असलेली बारा शिवालये व परिसर पहाटेपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी  भक्तांच्या लांब रांगा!

पैठण (प्रतिनिधी) : यंदाच्या पवित्र श्रावण महिन्याची सुरूवात सोमवारी मोठ्या भक्तिभावाने व तितक्याच पारंपरिक पद्धतीने झाली आहे.
पहिल्याच दिवशी पैठण शहर परिसरातील मुख्य व प्राचीन इतिहास असलेली बारा शिवालये व परिसर

पहाटेपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत शिवभक्तांनी गजबजून – फुलून गेली होती. दक्षिण काशीतील पिंपळेश्वर,गाढेश्वर,दोलेश्वर,सोमेश्वर, गोदेश्वर,गंगेश्वर,राजेश्वर, भूयारेश्वर,तारकेश्वर, हरहरेश्वर, कालिकेश्वर,ईंद्रेश्वर,बाललिंगेश्वर, शिद्धेश्वर,अमृतेश्वर यांसह सर्व लहान मोठ्या मंदिरात मंत्रोच्चारात अभिषेक व इतर धार्मिक विधी संपन्न झाले. महाराष्ट्रात एकमेव पैठण दक्षिण काशीत ही बारा प्राचीन शिवालये असून शेकडो वर्षांची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेली आहे. बहुतेक सर्वच मंदिरांना रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महिनाभर आनेक धार्मिक कार्यक्रम साजरे होणार आहेत. पौराणिक ग्रंथात उल्लेख असलेल्या गोदावरी नदी काठवरील श्रीक्षेत्र वडवाळी येथील श्री.वडवानालेशवर महादेव मंदिरातही श्रावणातील पहिल्या सोमवारी दर्शनासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली

. याशिवाय ग्रामीण भागातील गावोगावच्या महादेव मंदिरात भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. श्रीक्षेत्र वडवाळीत श्रावण महिन्यात पारंपरिक पद्धतीने भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *