छत्रपती संभाजीनगर ( प्रतिनिधी) : रेणुका महिला विकास सेवाभावी संस्था संचलित शारदा सुमन प्राथमिक शाळा व शारदा सुमन माध्यमिक शाळेमधे 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनवर सुषमा मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांच्या भाषणांनी कार्यक्रमाला शोभा आली. यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री दहीहंडे तुषार तसेच माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती साठे सोनिया यांची उपस्थिती होती. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्वांच्या उपस्थितीत तसेच एकमेकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम हसत खेळत पार पडला.