छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : दिनांक २९ ऑगस्ट २०२४ पासून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने जुनी पेन्शन लागू व्हावी व इतर सेवा विषयक मागण्यांच्या अनुषंगाने बेमुदत संप पुकारलेला आहे. जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या वतीने जिल्हा परिषद कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचे निवेदन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने मा.श्री. सुदर्शन तुपे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. छत्रपती संभाजीनगर यांना महासंघाचे राज्य सरचिटणीस संजय महाळकर, जिल्हाध्यक्ष गणेश धनवई, जिल्हा सरचिटणीस स्वप्निल घरमोडे, कार्याध्यक्ष ताहेर देशमुख कोषाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर बिडाईत, कार्यालयीन सचिव दिनकर अहेवाड, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, दत्तात्रय वाणी, उमेश मिसाळ, प्रसिद्धी प्रमुख शशिकांत गवळी, महासंघाचे जिल्हा पदाधिकारी रवि रेड्डी, के. आर. चव्हाण व विविध संवर्गाचे प्रतिनिधीची यावेळी उपस्थित होती.
