मुंबई : (प्रतिनिधी) पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांना आजपासून टोलमाफी टेम्याची घोषणा सरकारने केली आहे. वारकऱ्यांना २१ जुलैपर्यंत या टोलमाफीचा लाभ घेता येईल, पण त्यासाठी त्यांना आपल्या वाहनांचे दस्तावेज घेऊन आरटीओ जाऊन एक विशिष्ट स्टीकर घ्यावे लागणार आहे. हे स्टीकर घेतल्यानंतरच टोलनाक्यांवर टोलमाफीचा लाभ घेता येईल. यंदाच्या पंढरीच्या वारीला मुरुवात झाली आहे. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या पुण्यातून सासवडच्या दिशेने निघाल्या आहेत. त्यानतंर पुढील काही दिवसांत राज्यभरातील वारकऱ्यांची वाहने पंढरपूरच्या दिशेने जाताना दिसून येतील. त्यामुळे सरकारने दरवर्षीप्रमाणे मंदाही वारकऱ्यांच्या चाहरांना टोलमाफी जाहीर केली. या टोलमाफीचा लाभ वारकऱ्यांना २१ जुलैपर्यंत घेता येईल. पण बारकऱ्यांना ही टोलमाफी अशीच मिळणार नाही. यासाठी त्यांना पालखीतील वाहन मालकांना आपल्या वाहनाचे सर्वच दस्तावेज घेऊन जवळच्या आरटीओ कार्यालयात जावे लागणार आहे. तिथे वाहनांचे आरसी चूक, पीयुसी पावती, इन्शुरन्स आदी महत्वाचे दस्तावेज दाखवल्यानंतर आरटीओचे अधिकारी सदर वाहन धारकाला एक पास व स्टीकर देतील. हे स्टीकर बाहनावर लावल्यानंतर सदर बाहनाला टोलनाक्यावर टोलमाफीचा लाभ दिला जाईल. या पास व स्टीकरशिवाय वारकऱ्यांना टोलमाफीचा लाभ मिळणार नाही. उल्लेखनीय बाच म्हणजे राज्य सरकारने २०२२ मध्ये पहिल्यांदा चारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला होता, पण प्रत्यक्ष टोलनाक्यावर ही योजना फोल खली होती. यामुळे अनेक ठिकाणी बाद झाले होते. त्यानंतर २०२३ मध्ये दुसन्या वर्षीही असाच बाद उत्पत्र झाला होता. त्यामुळे सरकारच्या टोलमाफीचा लाभ नेमका घ्याचा कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण यंदा सरकारने हा लाभ कसा घ्यायचा हे स्याह करुन वारकरी व टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचा संभाव्य बाद राळण्याचा प्रयत्न केला आहे. वारीला निघालेल्या वाहनाच्या फास्टंगमध्ये पैसे असतील व तुम्हाला टोलमाफीचा पास मिळाला असेल

तर तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतील. एकतर फास्टंगवर अॅल्युमिनियम फॉईल लावावा लागेल किंवा आतून स्क्रीन ऑन केलेला मोबाइल धरावा लागेल, असे केल्यास टोलनाक्यावरील स्कॅनरला तुमचा फास्टंग स्कॅन करता येणार नाही व तुमचे पैसे कापले जाणार नाहीत, राज्यभरातून पंढरपूरच्या दिशेने ये येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसलाही या टोलमाफीचा लाभ देण्यात आला आहे. तशा सूचना राज्य शासनाने संबंधितांना दिल्या आहेत. यावर्षी आषाढी एकादशी एक १७ जुलै रोजी येत आहे. या यात्रेसाठी यंदा प्रथमच अगदी भंडीशेगावपासून पंढरपूर शहरापर्यंत ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदाची आषाढी एकादशी आजपर्यंतच्या आषाडीतील बेस्ट असेल, असा विश्वास सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एका वृतवाहिनीशी बोलताना व्यक्त केला आहे. यंदा मंडीशेगाव, बाखरी या पालखी मार्गावरील इमारती, झाडांना आकर्षक विद्युत रोषणाई करून लाखो भाविकांचे स्वागत केले जाणार आहे. यानंतर पालखी सोहळे पंढरपुरात पोहोचल्यानंतर इसबाची, कॉलेज चौक, चंद्रभागा वाळवंट, भाविकांचे निवासस्थळ असणारे ६५ एकरावरील भक्तिसागर अशा विविध ठिकाणी हे आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यासाठी विविध जागांची पाहणी केली असून पालखी सोहळे केग्यापूर्वी ही विद्युत रोषणाई पूर्ण केली जाणार आहे.