पुणे ; प्रतिज्ञापत्र करण्यासाठी यापुढे ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपर अर्थात मुद्रांक खरेदी करावे लागणार आहेत. राज्य सरकारने १०० आणि २०० रुपयांचे मुद्रांक बाद केले आहेत. त्यामुळे साठेखतानंतरचे खरेदी खत, हक्कसोड पत्र आदी कागदपत्रांसाठी जादा रम मोजावी लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या महसुलात भर पडणार असली तरी सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसह विविध प्रकारच्या योजनांवर कोट्यवधी रुपयांची खैरात सुरू केली असताना अन्य योजनांसाठी निधी कमी पडू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसुली म्हटले जात आहे. ज्या दस्त प्रकारांसाठी आतापर्यंत १०० किंवा २०० रुपयांचे स्टॅम्प पेपर चालत होते,

ते वाढवून आता कमीत कमी ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपर घ्यावे लागणार आहेत. याआधी प्रतिज्ञापत्रे, हक्कसोड पत्रे, साठेखत केल्यानंतर पुन्हा खरेदी खत करताना ते १०० रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर केले जात होते. त्यासाठी १०० ऐवजी आता ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपर वापरण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयातील कामांसाठी मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्या निर्णयात मात्र कोणताही बदल झाला नाही, असे नोंदणी मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व दस्त प्रकारांसाठी नवीन मुद्रांक शुल्क दररचना केली आहे.