छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : हिमायतबागजवळील सर्वेक्षण क्रमांक १०७ येथे शेख मोहंमद साबीर यांनी लॉकडाऊनपूर्वी अनधिकृत प्लॉटिंग केली होती. मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाने बुधवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात साबीर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जुन्या विकास आराखड्यानुसार हा परिसर ‘ग्रीन झोन’ आहे. त्यानंतरही अनेक भूमाफियांनी अनधिकृत प्लॉटिंग पाडून जमिनी विकल्या. ‘२० बाय ३०’ आणि त्यापेक्षा मोठे प्लॉट पाडून विकले. मोहंमद साबीर यानेही प्लॉटिंग पाडून भूखंडांची विक्री केली. त्या वेळी मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने प्लॉटिंग काढून काही साहित्यही जप्त केले होते. त्यानंतर लॉकडाऊनचा फायदा घेत त्याने सर्व प्लॉट विकून टाकले. नागरिकांनी आता या ठिकाणी घरे बांधायला सुरुवात केली, जडी मौर फकर अली यांनी अनधिकृत प्लॉटिंगसंदभांत मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे तक्रार दाखत केली.
मनपाकडून पोलिसांत तक्रार
साबीर याने एमआरटीपी अॅक्टनुसार कायद्याचे उल्लंघन केले. त्यांना मनपाकडून नोटीसही बजावण्यात आली. नोटीसचे उत्तर समाधानकारक नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांनी रात्री बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत होते.