छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : ऐंटी करप्शन अँड क्राइम कंट्रोल कमेटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसीम शेख यांनी दि 29.01.2024 रोजीचे अर्जान्वये म.न.पा छ संभाजीनगर हददीतील मौजे हर्सूल ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट नंबर 15 मधील 11 हेक्टर 9 आर ही जमीन खाज्या हुसनोदिन अहेमद यांच्या नावावर 7/12 उता-याची नोंद आहे. परतु गट नं 15 मध्ये सदर जमीनीवर राहणारे / कब्जेदार यांनी बेकायदेशीररित्या कायदेशीर दस्त त्याचे नावे नसतानाही अथवा कोणत्याही महसुल म.न.पा कार्यालयाची परवानगी न घेता सदर जमिनीवर करोडो रुपयांचे बगले बाधलेले आहेत तसेच सदर कब्जेदार यांनी शासनाचे करोडो रुपयांचा महसुल कर बुडविलेला असुन शासनाची आर्थिक फसवणुक केलेली आहे. तसेच सदर कब्जेदार यांचे 7/12 उतारे अथवा महसुली रेकॉर्डवर नावाची नोद नसताना फक्त कब्जाआधारे सदरल जमिन बेकायदेशीररितया बॉण्ड पेपरवर करोडो रुपयांचा व्यवहार करुन शासनाची फसवणुक करत आहेत, परिणामी प्रॉपर्टी अॅक्टचे उल्लंघन सदर कब्जेदार करत आहेत तरी सदर बाबींची तात्काळ बौकशी करुन त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करनेबाबत तक्रार केलेले आहे. वसीम शेख याचे अर्जात नमूद मुदयाच्या अनुषंगाने नियमानुसार तात्काळ चौकशी करुन आपला वस्तुनिष्ठ अहवाल तात्काळ या कार्यालयास सादर करावा असे पत्र अप्पर तहसीलदार यांनी मंडल अधिकारी व तलाठी हर्सूल यांना पत्र देउन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
