छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) उद्या “हम दो हमारे बारह हिंदी चित्रपटाच्या स्थगितिवर मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात सकाळी सुनावणी होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहे. न्यायालयाच्या निकालानंतर प्रदर्शन होऊ शकते परंतु हा चित्रपट आता एमआयएमच्या रडारवर आली आहे. एका विशिष्ट धर्माला टार्गेट करण्यासाठी व बदनामी करण्यासाठी दिग्दर्शकाने व कलाकारांनी पैसे कमावण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे असा आरोप एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील यांनी करत प्रदर्शन उधळण्याचा इशारा दिला आहे. चित्रपटगृहात या चित्रपटाचे सर्व तिकीट खरेदी करून आत जा आणि तुम्हाला माहित आहे काय करायचे असा इशारा आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे

. प्रदर्शनावेळी चित्रपट गृहांना पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे असेही त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले आहे.