छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर, एकता नगर: आज शुभ शनिवारच्या दिवशी, भाजपा प्रदेश महामंत्री श्री. संजयकुमार केणेकर यांच्या हस्ते शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे जागृत हनुमान मंदिरात (आठवी आरती) हनुमान महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या भक्तिमय सोहळ्यात नगरसेवक श्री. पुनमचंद बमणे, श्री. विजय औताडे, श्री. राजगौरव वानखेडे, श्री. रामेश्वर भादवे, तसेच आयोजक श्री. रामलाल बकले आणि श्री. पंकज साखला यांसह श्री. दीपक ढाकणे, श्री. सतीश ताठे, श्री. सागर भारस्कर, श्री. गणेश फुले, श्री. रवी राजपूत, श्री. उज्वल मगरे, श्री. मंगेश सनासे आणि अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
. श्री हनुमानाच्या चरणी भक्तिभावाने अर्पण करण्यात आलेल्या या महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालून निघाला. धार्मिक उत्साह आणि भक्तीभाव यांचा सुरेख संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.