वैजापूर ; स्वच्छता हीच सेवा – 2024 अभियानांतर्गत वैजापूर शहरात महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद वैजापूर मा.डॉ संगीता नांदुरकर मंडम यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.या निमित्ताने स्वच्छता बाबत विविध उपक्रम घेण्यात आले या मध्ये सास्कृतिक कार्यक्रम,सायकल रली ,रांगोळी स्पर्धा , तसेच उपमुख्यधिकारी मा.राहुल साठे सर याच्या सहकार्याने स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत 2 ऑक्टोबर 2024 महात्मा स्वच्छता रली ,मानवी साखळी ,इत्यादी उपक्रम राबविण्यात आले महात्मा गांधी यांच्या जयंती निम्मित्त 2 ऑक्टोबर या दिवशी स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत नगर परिषद वैजापूर मार्फत नगर परिषद् कार्यालय समोर, पंचायत समिति परिसर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर व विविध ठिकानी स्वछता करुण जयंती साजरी करण्यात आली, तसेच स्वच्छता ही सेवा- 2024 स्वच्छता संस्कार स्वच्छता पंधरवडा निमित्त नगरपरिषद वैजापूर येथील भगवान महावीर दवाखाना नगरपरिषद येथे आरोग्य शिबिर मोहीम राबविण्यात आले.

आज सकाळी मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी मा.डॉ संगीता नांदुरकर मंडम यांनी स्वताः स्वच्छतेचा झाडू हातात घेऊन वैजापूर शहर स्वच्छ करण्याचा मानस सर्व कर्मचाऱ्या च्या मनात निर्माण केला आहे .या विविध कार्यक्रमामध्ये स्वच्छता निरीक्षक श्री अंकुश रुस्तुम भराड, पाणी पुरवठा अभियंता श्री सुरेश चिमटे , सहाय्यक स्वच्छता निरीक्षक श्री प्रमोद निकाळे सहाय्यक स्वच्छता निरीक्षक श्री विष्णू आलुले वैद्यकीय अधिकारी श्रीमती सविता निकाले परिचारिका निर्मला जाधव श्री जयपाल शिसोदिया ,श्रीमती मंजिरी खैरे , श्री कुलकर्णी ,भंडारपाल शेटे पाटील ,साळवे , स.प्रकल्प अधिकारी सुनिल भाग्यवंत, श्री गडकर श्री संतोष रत्नपारखे श्री नन्नावारे श्री गाडेकर समुदाय संघटक दिवाकर त्रिभुवन, पाटील मुकदम श्री रमेश त्रिभुवन , श्री राहुल बनकर, श्री संजय त्रिभुवन, श्री चैतन्य खाडे, श्री प्रथमेश त्रिभुवन व स्वच्छता कर्मचारी व महिला उपस्थित होत्या. हि स्वच्छता संपूर्ण वैजापूर शहरात 2 ऑक्टोंबर बुधवार रोजी करण्यात आली तसेच या पुढे स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत व नगर परिषद वैजापूर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्रित उपक्रम राबून वैजापूर शहर आपले शहर स्वच्छ शहर करणार आहेत अशी सर्वांनी शपत घेतली