स्टेशन चौकात महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ, धमकी आणि मारहाण — रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल!

स्टेशन चौकात महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ, धमकी आणि मारहाण — रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल!

छत्रपती संभाजीनगर – वेदांतनगर पोलिस ठाण्यात 11 ऑगस्ट 2025 रोजी एका महिला शासकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ, धमकी, मारहाण आणि चोरी केल्याच्या आरोपावरून रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला (वय 36), सरकारी कामगार अधिकारी, या रेल्वेस्टेशनकडे शेअरिंग ऑटोरिक्षाने येत असताना स्टेशन चौक येथे उतरल्या. त्या वेळी आरोपी युसुफ मोहम्मद अली अन्सारी (वय 27, रा. मोमीनपुरा, दौलताबाद) याने त्यांना “तुम भिकारी हो क्या… 20 रुपये दे दो” असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने अंगावर धावून जात हाताला स्पर्श करत धमकी दिली.
आरोपीने फिर्यादीच्या हातातील बॅग व मोबाईल हिसकावून घेतला. घटनास्थळी ड्युटीवर असलेले वाहतूक पोलिस गिरी आणि पोलीस अंमलदार राठोड यांनी हस्तक्षेप केला असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ, धक्काबुक्की करून चलन मशीन खाली फेकून दिली.
या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 151/2025 कलम 74, 352, 351(2), 119(1) भा.दं.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मपोउपनि. गिरी करत आहेत.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *