छत्रपती संभाजीनगर,; जिल्ह्यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधील स्कूल बस तपासणी करण्याच निर्देश दण्यात आले आहेत. या तपासणीमध्ये प्रत्यक स्कूल बसच्या तांत्रिक आणि सुरक्षा बाबींसह वाहन चालकांची आरोख आणि चारित्र्य तपासणी यांचा समावेश असणार आहे. या निर्देशाचे पालन सर्वांनी करण्याचेआवाहन जि.प.प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यानी केले आहे. जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची (शहर ग्रामीण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बाळानी स्वस्तरावर करावयाच्या उपाययोजनांबाबत देश देण्यात आले. यात शालेय व्यवस्थापनाने मुलीच्या सुरक्षिततेसाठी महिला चालकांची नेमणूक करण्यावर भर द्यावा व त्यांना प्रोत्साहन द्यावे, मुख्याध्यापकांनी पालकांची बैठक घेऊन,स्कूल बसच्या सुरक्षा निकषांची जनजागृती करावी विद्यार्थ्यांना बेकायदेशीर आणि असुरक्षित वाहनांमध्ये पाठवू नये, यावाचत पालकांना सूचना द्याव्यात. प्रत्येक वर्षों स्कूल बस चालकांचे चारित्र्य प्रमाणपत्र घेऊन त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. विद्याथ्यांच्या वाहनांसाठी शाळेच्या शिक्षक वा कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. प्रत्येक स्कूल बसमध्ये कॅमेरा आणि पॅनिक बटन बसवणे, सर्व स्कूल बसवर ११२ पोलिस हेल्पलाईन नंबरचे स्टिकर अनिवार्यपणे लावावे, आदी बाबींचा समावेश असणार आहे.
शाळा तपासणी मोहीम सुरू

प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, प्रत्येक शाळेवर तपासणी अधिकारी पाठवले जाणार आहेत. या तपासणीदरम्यान, वरील सर्व नियम आणि पाहणी केली जाईल. त्यामुळे सर्व शाळानी तातडीने या सूचनांची अमलबजावणी करावी, अन्यथा कठोर कारवाई रण्यात येईल. विद्याथ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे शाळांनी आणि पालकांनी सहकार्य करून शालेय वाहतुकीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.