छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) :.दि २२/१०/२०२४ रोजी पोस्टे सिटी चोक येथे हजर असताना सपोनि मनिषा हिवराळे यांना त्यांच्या गुग्न बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, एक ईसम ज्याच्या अंगात पिवळया रंगाचा शर्ट व निळया रंगाची पेट घातलेला अशा वर्णनाचा जो की, हर्षनगर, लेबर कॉलनीच्या मोकळया जागेमध्ये नशेच्या गाळया विक्री करण्यासाठी येणार आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाली त्यानंतर सपोनि मनिषा हिवगळ पोलीस उप निरीक्षक, अर्जुन कदम, सफी/५०६ मुनीर पठाण, पोह/१५१४ साळुंके, पां/२४१३ इप्पर, पो.अं./२०७७ वाहुळ, पोअ/२९६६ मनोहर त्रिभुवन पोअ/४४४ गायकवाड असे हर्षनगर, लेबर कॉलनी, येथील मोकळ्या मैदानाच्या अलीकडे पोहचलो तेथे पोहचल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी सापळा लावुन थांबलो असता तेथे मिळालेल्या माहिती प्रमाणे एक इंसम ज्याच्या अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट व निळया रंगाची पैट असा असलेला एक इंसम दिसुन आला. त्याची पोह/1514 साळुंके यांचे मार्फतीने ईसम शेख अतिक पिता शेख अब्दुल्ला याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात खालील वर्णनाचा माल मिळून आला.
700/- रुपये किमतीच्या ज्यावर इंग्रजीमध्येAlprazo 0.5 (Alprazolam Tablets IP) B.No. 020324 BAML mfg date Mar.2024 Exp. Feb-2027 असे वर्णन असलेल्या 20 x 10 = 200 Tablets असे मिळुन आल्या. उत्पादकाचे नाव Biogenetics Pvt. Solan (IH.P.)Marketed by APCO Medizone India Pvt. Ltd. Mumbai-400033
700/- रुपये एकूण किमत. सदरची कार्यवाही मा. पोलीस आयुक्त, श्री. प्रविण पवार, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०१. श्री. नितीन बगाटे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर विभाग, श्री. संपत शिंदे, मा. पोलीम निरीक्षक, श्रीमती निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनिषा हिवराळे, पोलीस उप निरीक्षक, अर्जुन कदम, सफो/५०६ मुनीर पठाण, पोह/१५१४ साळुंके, पोअ/२४१३ इप्पर, पो.अं./२०७७ वाहुळ पोअ/२९६६ मनोहर त्रिभुवन पोअ/४४४ गायकवाड सर्व नेमणुक पोलीस स्टेशन, सिटीचोक, छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई केली आहे.