छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) शैक्षणिक वर्ष २०२३ २४ या वर्षाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यामध्ये महानगरपालिकेच्या १७ शाळेमधील एकूण ७९९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यातील ७०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले महानगरपालिका शाळांचा एकूण निकाल ८७.७०% लागला त्या मध्ये दोन शाळांचा १००% पाच शाळांचा निकाल ९०% च्या वरती लागला आहे.महानगरपालिकेच्या १७ शाळेमधील ७५ टक्के च्या वरती गुणवंत ५१ विद्यार्थ्यांना महानगरपालिका मुख्यालय मध्ये बोलावून सत्कार करून अभिनंदन. केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त महणाले की महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी फक्त प्रमाणपत्रावर जास्त गुण घेऊन नव्हे तर गुणवंत व्हावेत मी सुद्धा गरीब कुटुंबातीलच आहे व त्यामध्येच मी माझे शिक्षण केले तुम्ही सुद्धा भविष्यात माझ्यासारखा ख ड, खझड अधिकारी व्हावं, डॉक्टर इंजिनिअर व्हावं यासाठी शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातील एक सुजाण नागरिक व्हावा, ज्यांना डॉक्टर इंजिनिअर व्हायचे असेल त्यांच्यासाठी मी महानगरपालिकेमधील डॉक्टर इंजिनियर यांना ाशी म्हणून उपलब्ध करून देईल तसेच शाळेमध्ये सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्राधान्य असेल त्यामध्ये विशेष करून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मी प्रत्येक शाळेत आर्टिफिशल टर्फ तयार करत आहे त्याचाही शहरातील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील आयुक्तांनी केली पुढे बोलताना आयुक्त यांनी सांगितले की जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असतील त्यांनी कसलेही खचून न जाता आपण आयुष्यातील एक परीक्षा अनुत्तीर्ण झालो म्हणून आपले

आयुष्य संपले असे होत नाही तर आपण परत परीक्षा द्यावी आणि पास व्हावे तसेच या विद्यार्थ्यांना एक जून ते १० जून च्या दरम्यान शाळांनी शाळेत बोलवावे व त्यांचे समुपदेशन करावे भविष्यात या विद्यार्थ्यांना काय व्हायचे आहे त्या बाबत मार्गदर्शन करावे असे आदेश सुद्धा शिक्षणाधिकारी मनपा यांना दिलेयामध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी अक्षरा दत्तू सोनवणे, द्वितीय आलेली रोजी डिसूजा तृतीय आलेली यासीर सिद्दिकी आणि सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम लहूर माध्यमातून शाळेत आणलेली विद्यार्थिनी भारती कांबळे या विद्यार्थ्यांनी सह महानगरपालिकेच्या सर्व गुणवंत ५१ विद्यार्थ्यांचा सत्कार माननीय
आयुक्त तथा प्रशासक महोदय यांनी आज केला या वेळी अकुश पांढरे उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख, गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी, भारत तिनगोटे शिक्षण अधिकारी, ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी तसेच संजीव सोनार, संगीता ताजवे, शेख अहमद पटेल, उर्मिला लोहार केंद्रीय मुख्याध्यापक आणि माध्यमिक शिक्षक व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी सेवकांनी परिश्रम घेतले.