सार्वजनिक बांधकाम विभागाचा मनमानी कारभार, दिला आमरण उपोषणाचा इशारा लोकसेवक यांचा ठेकेदाराशी हात मिळवणी

सार्वजनिक बांधकाम विभागाचा मनमानी कारभार, दिला आमरण उपोषणाचा इशारा लोकसेवक यांचा ठेकेदाराशी हात मिळवणी

छत्रपती संभाजी नगर { प्रतिनिधी हेमंत वाघ.} खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी ते ताजनापूर रस्त्यावरील धाड नदीवरील पुलाचे काम चालु असून, त्या नदीलगत सदरील पुलालगत शेतजमीन गट क्रमांक २८७ असून, मागील वर्षी पुलाचे काम सुरू करण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले होते.शेतकरी नामें हरिदास कारभारी सराटे यांनी शेतजमीनीच्या बांधाच्या लगत नदी असल्याने मातीचा भराव करून,मोठी संरक्षण भिंत बांधलेली होती.ती या कामामुळे वाहून गेली.या सार्वजनिक बांधकाम उपविभाग, खुलताबाद येथील उप अभियंता नामे कोलते व शाखा अभियंता नामे सावजी यांनी संबंधित कंत्राटदार याच्याशी स्वार्थापोटी हातमिळवणी करून,माझे शेतीचे नुकसान केले.मातीचा भरणा करून देऊ असे तोंडी सांगितले परंतु अद्याप त्यांनी ते काम केलेले नाही.संबंधित विभागातील लोकसेवक हे शेतकऱ्यांच्या मुळावर व त्रास देण्याच्या उद्देशाने व आपला स्वार्थ साधून कंत्राटदाराशी हात मिळवणी करतात,हे या प्रकारावरून स्पष्टपणे दिसून येते.

धाड नदीच्या पुलाचे काम व शेतकऱ्यांच्या बांधाची व मातीचा भरणा केलेली संरक्षण योग्य निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करणे अपेक्षित असताना, अद्याप कुठलीही भूमिका सार्वजनिक बांधकाम विभागातील लोकसेवकांनी घेतलेली नाही.शेतजमिनीच्या बांधाला मातीचा भरणा न केल्यास,नदीतील पाण्यामुळे भविष्यात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल.अशा होणाऱ्या नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी कार्यकारी अभियंता (पश्चिम) यांची राहील अशा आशयाचे तक्रारी निवेदन रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिदास सराटे यांनी दिनांक ०४-०३-२०२५ रोजी संबंधित सर्व विभागांना दिले असल्याचे सांगितले आहे. तरी अद्याप प्रशासनाने याबाबत कुठलाही ठोस निर्णय न घेतल्याने रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिदास सराटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून,नंतर यासंबंधी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *