सामान्य नागरिकांना दिलासा, प्रिपेड विजेचे मिटर शासकीय कार्यालयावर बसवणार

सामान्य नागरिकांना दिलासा, प्रिपेड विजेचे मिटर शासकीय कार्यालयावर बसवणार

सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर नाहीत…

मुंबई : महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याच्या योजनेत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण ट्रान्सफॉर्मर आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. तथापि, सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत.
महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय, भारत सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (आरडीएसएस) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मिटरिंग यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत

. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. प्रिपेड विजेचे मिटर बसविण्याच्या निर्णयाविरोधात नागरीकांनी आंदोलन केले होते. आता हे प्रिपेड मिटर शासकीय कार्यालयावर बसवण्याचा निर्णय झाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *