गेवराई मर्दा ; तालुक्यातील गेवराई मर्दा येथे सरपंच मा. विक्रम जायभाये यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत तरुण युवकांच्या वतीने आज दि.29 सप्टेंबर रविवार रोजी आयोजित रक्तदान शिबिरात 15हुन अधिक नागरिकांनी रक्तदान केले. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.पैठण तालुक्यातील गेवराई मर्दा या छोट्याश्या गावात श्री.हनुमान मंदिर व संत भगवान बाबा मंदिरमध्ये हेगडेवार हास्पिटल व दत्ताजी भाले ब्लड बँक डॉ. दिलीप डांगे व टिम छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
. सर्वप्रथम रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे सह रक्तसंकलन टिमचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावचे सहकार सोसायटीचे चेरमन राजू सांगळे यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांसमोर मांडली. या रक्तदान शिबिरात 15 हुन अधिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. या रक्तदान शिबिरामध्ये आकतर पठाण पठाण या मुस्लिम युवकाने सर्वप्रथम रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन शुभारंभ केला. गावातील जनतेने सुद्धा आपला सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
. या कार्यक्रमाचे सर्व गावकऱ्यांनी व दत्ताजी भाले ब्लड बँक डॉ. दिलीप डांगे, रक्त संक्रमण अधिकारी श्री आप्पा सोमासे, जनसंपर्क अधिकारी श्री अजित काळे, तंत्रज्ञ, श्री वामन, श्री भागवत लेंढे , सर्वश्री तुषार, अमोल, वैभव व गणेशव याच्या टीमने कौतुक केले. याप्रसंगी गावातील सर्व अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रतिष्ठित मंडळी, युवक बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व रक्तदात्यांना विकास राठोड व जितेंद्र सूर्यनारायण यांच्या कडून चहा व अल्प उपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक अभिनव उपक्रम कार्यक्रम राबवावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.