सरपंच आगलावे साहेबांच्या हस्ते होनोबाची वाडी येथे ड्रेनेज लाईनचे ऊदघाटन

सरपंच आगलावे साहेबांच्या हस्ते होनोबाची वाडी येथे ड्रेनेज लाईनचे ऊदघाटन

गेवराई ; दि.१८ सप्टेंबर २०२४ रोजी ग्रुप ग्रामपंचायत गेवराई बू अंतर्गत येणा-या होनोबाची वाडी येथे विलास बापु भुमरे साहेबांच्या सहकार्याने
आणी प्रभाकर आगलावे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ग्रामपंचायत सदस्य गजानंद बोहरा, अमरसींग बहुरे, सुभाष राठोड, आणी प्रल्हाद वाघ यांच्या मागणीनुसार ड्रेनेज लाईनचे उदघाटन करण्यात आले, यावेळी गजानंद बोहरा यांनी ग्रामस्थांना सांगीतले की ग्रामपंचायतच्या माध्यमातून तसेच छ.संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार मा.ना. श्री.संदीपान पाटील भुमरे यांच्या माध्यमातून भविष्यामधे आपल्या गावात प्रत्येक गल्लीमधे सिमेंट रोड करणार आहोत, पेव्हर ब्लॉक बसवणार आहोत, स्ट्रीट लाईट बसवणार आहोत, तसेच गरजेनुसार आपल्या वाडीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या विकासकामावर भर देनार आहोत.

से गजानंद बोहरा यांनी सांगीतले. आणी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानले. यावेळी कडुबा मोघे, कैलास वैष्णव, कचरु आरसुड, भाऊसाहेब आरसुड, कीसनदास वैष्णव, लक्ष्मण महेर भिमराव मोघे, गुलाब आरसुड, किशोर मोघे, हारसींग महेर, संजय वैष्णव, गणेश आरसुड, अर्जुन मोघे, विनोद मोघे, करण आरसुड, शिवाजी चव्हाण, प्रकाश राठोड, कैलास चव्हाण, दुर्गादास जाधव, हारसींग मॅकॅनिक, आणी ग्रामस्थ उपस्थित होते

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *