छत्रपती संभाजीनगर, ( प्रतिनिधी): जिल्हा नियोजन समितीवर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते समीर (चिंतन) शाहा, रमेश सुरसे या दोघांची राज्य सरकारने विशेष निमंत्रीत म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) (सुधारणा) अधिनियम, क्रमांक ३०/२००० मधील कलम ३ चा पोटकलम (३) चार (फ) येथील तरतूदीनुसार संदर्भ क्र. ६ च्या शासन निर्णयासोबत जोडलेले विवरणपत्र मध्ये दर्शविलेल्यानुसार विशेष निमंत्रित म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हयाच्या जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशन करण्यात आले आहे

.सदरील नामनिर्देशन पुढील आदेश होईपर्यंत किंवा शासनाकडून सदर नामनिर्देशन रद्द होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल, तोपर्यंत अबाधित राहतील असेही शासन निर्णयात नमूद केलेले आहे. समीर (चिंतन) शाहा, आणि रमेश सुरसे यांच्या नियुक्तीचे आमदार प्रदीप जैस्वाल व अन्य कार्यकर्तेयांनी स्वागत केले.