सिल्लोड (प्रतिनिधी) : मौजे धोतरा येथे कबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांचा मोठा मुलगा अब्दुल समीर आनंदाचा शिधा या योजनेचा प्रचार करण्यासाठी गेला असता, यावेळी कार्यकर्ते व जनत मोठा जमाव झाला. यावेळी राजकीय पुढारी म्हणले की गर्दी होणारच अशावेळी गर्दीतून ढकलाढकली होतेच. पण या ढकलाढकलीत सुरक्षा रक्षकाला धक्का लागला असावा पण त्यात एवढे तणावा सारखे काही नव्हते पण काय कुणास ठाऊक अब्दुल समीरच्या सुरक्षा रक्षकाने राजपूत समाजाच्या एका व्यक्तीला धक्काबुक्की करून मारहाण केली
. सदरील वार्ता संपूर्ण गावात पसरली, तेव्हा गावातील नागरिकांनी अब्दुल समीरला धक्काबुक्की करत त्याच्या सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली व त्यांच्या गाडीच्या काचा फोडून टाकले. तसेच घोषणाबाजी करत त्यांना गावातून पिटाळून लावले. सदर प्रकारामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तालुक्यात प्रचंड चीड व राग असल्याचे दिसत आहे. सत्तेची मस्ती असल्याचेही जनतेच्या रोषातून दिसून येत होते. येत्या निवडणुकीत याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.