पतंगाचा मांजा वापरणाऱ्या वर कठोर कार्यवाही करा- साबळे सामाजिक प्रतिष्ठान ची मागणी
सिल्लोड आज सकाळी टिळकनगर परिसरामध्ये विद्युत पोल मध्ये पतंगात वापरण्यात येणारा मांजा अडकलेला होता . यामध्ये या परिसरामध्ये असलेले एक कबूतर यामध्ये अडकले होते जवळपास दोन तास हे कबूतर यामध्ये अडकले होते. सकाळी परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास एक कबूतर मोठ्या प्रमाणामध्ये मांजाला गुंडाळलेले आढळले मात्र विद्युत पोलवर असलेल्या मांज्या तसेच उंच अडकलेला कबूतर त्यास काढणे जोखमीचे होते या परिसरामध्ये असलेले नागरिक डॉ सचिन साबळे, पारस कर्नावट , राऊत ताई, शालेय वाहन चालक नंदू कदम पाटील, यांनी शाळेची वाहन असलेली गाडी या ठिकाणी विद्युत पोल जवळ लावून अलगदपणे पतंगाचा मांजा मध्ये अडकलेला कबूतर यास जीवदान दिले
.
विशेष म्हणजे कबुतरांनी जवळपास दोन तास या मांज्यातून निघण्याचा प्रयत्न केला परंतु 6 वाजे ची सकाळची वेळ असल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही बाब आली नाही. यामुळे या जवळपास दोन तास हे कबूतर अडकलेले होते. सतर्क नागरिकांमुळे या कबुतरास जीवदान मिळाले आहे. दरम्यान पतंगाच्या मांजा मुळे पशु प्राणी तसेच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला असून या मांजाची विक्री करणाऱ्या तसेच पतंग उडवणाऱ्या व्यक्तींवर प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्य करणाऱ्या मातोश्री गयाबाई साबळे प्रतिष्ठानच्या वतीने डॉ सचिन साबळे, पंडित आव्हाड, अनिल साबळे, भगवान राऊत, विजय आव्हाड, विशाल मिसाळ,शुभम आव्हाड, आदींनी केली आहे.