गंगापूर / प्रतिनिधी :कैसर जोहरी ; गंगापूर तसेच खुलताबाद तालुक्यात दोन दिवसा पासून सुरू असणाऱ्या पावसामुळे कापूस,मका, टोमॅटो तसेच सीताफळ सारख्या तसेच इतर फळबागांचे अतोनात नुकसान झाले असल्याने तात्काळ प्रशासनाच्या वतीने या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या पिकांचे पंचनामे करून एनडीआरएफ तसेच एस डीआर एफ च्या निकषानुसार शेतकरी बांधवांना तात्काळ मदत मिळण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी छत्रपती संभाजी नगर यांना आमदार बंब यांनी पत्राद्वारे कळवले आहे. मतदारसंघात सर्वत्र गारपीटी सह पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांच्या हाता तोंडाशी आलेले कापासाचे पीक डोळ्यादेखत मातीमध्ये रूपांतरीत झाले आहे तसेच सीताफळ व फळ बागासह टोमॅटो पिके देखील नष्ट झाली आहेत .लहान लेकरा प्रमाणे जपलेली ही पिके नष्ट होतांना पाहून बळीराजा हळहळ व्यक्त करत असल्याने ऐन सणासुदीच्या तोंडावर हे आर्थिक संकट शेतकऱ्यांपुढे आ वासून उभे आहे.

त्यामुळे दिवाळी सारख्या सणावर देखील सावट येऊन शेतकरी बांधव मेटाकुटीला आला आहे. याचा विपरीत परिणाम बाजारपेठेवर देखील होऊ शकतो, तरी आपण नैसर्गिक संकट म्हणून तात्काळ संबंधितांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याबाबत आदेशित करावे तसेच या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना एनडीआरएफ तसेच एसडीआरएफ निकशा नुसार आवश्यक ती कार्यवाही करून लवकरात लवकर या शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देण्याबाबत योग्य त्या उपाय योजना कराव्यात अशा आशयाचे पत्र आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हाधकाऱ्यांना दिले आहे.