संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्यास – देशात आग लागेल : अण्णा हजारे

संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्यास – देशात आग लागेल : अण्णा हजारे

अहमदनगर : आज राज्यात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. भाजपाचा संविधान बदलण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत आहे

. यावर अण्णा हजारे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.कुठल्याही सरकारने अथवा पक्षाने संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात आग लागेल परंतु संविधान बदलण्याची गरज काय? जगात सर्वात चांगलं भारताचं संविधान आहे. ते बदलण्याचा कुणीही प्रयत्न करू नयेफ अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना अण्णा हजारे यांनी दिली आहे.दरम्यान देशात लोकसभा निवडणुकीचा चौथ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांनी ८८ व्या वर्षी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना देश बळकट करायचा असेल तर मतदान करायला हवं, चारित्र्यसंपन्न लोकांच्या हातामध्ये देश देण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *