छत्रपती संभाजीनगर : { प्रतिनिधी } छत्रपती संभाजीनगर- मालेगाव महामार्ग आणि धुळे सोलापूर मार्गावरील पाचपीरवाडी फाटा परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून, यामुळे या ठिकाणी रोजच लहान-मोठे अपघात होत आहेत. आतापर्यंत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या मार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. मार्गावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यातून वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर जागोजागी दुभाजक तुटलेले असून, या जागेतून वाहतूक केली जात आहे. यामुळे सुद्धा अपघाताचे प्रमाण या परिसरात वाढले असून संबंधित ठेकेदार व इंजिनिअर यांना याबाबत सांगितले असता तात्पुरत्या स्वरूपाचे माती मिश्रित मुरुमाने खड्डे बुजवले जातात. यामुळे आणखीनच चिखल याठिकाणी होतो.

या हे ठिकाण चौफुलीचे असल्याने व जागतिक पर्यटन स्थळ वेरूळ येथे श्रावण महिना निमित्ताने वेरूळ खुलताबाद येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता तत्काळ खडी व चिखलमय रस्त्यासह खड्ड्याने वाहनधारक त्रस्त डांबराने खड्डे बुजवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते व प्रवासी वाहनधारकाकडून होत आहे. दरम्यान रविवारी पडलेल्या पावसामुळे पुलाखाली रोडला तळ्याचे स्वरूप आले होते.