पैठण (प्रतिनिधी) : दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी गेवराई खुर्द ता.पैठण जि.छ.संभाजीनगर येथील श्री शंभुराजे गणेशमंडळाची संप्याकाळची आरती भावी जिल्हापरिषद सदस्य श्री गजानंद बोहरा साहेबांच्याहस्ते करण्यात आली.तसेच गणेश मंडळाच्यावतीने माजी ऊपसरपंच बद्री चाव्हाण यांच्याकडुन गजानंद बोहरा यांचा शाल घालुन सत्कार करण्यात आला. गणपतीची आरती संपन्न झाल्यानंतर गजानंद बोहरा यांनी गणेश मंडळाच्या सर्व टिमचे आभार मानले, व स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या तरुनांना यश मिळेपर्यंत अविरतपणे अभ्यास करत राहन्याचा सल्ला दिला तसेच तरुण वर्गाने कोनत्याही दुर्व्यसनापासुन लांब रहावे, आई वडीलांना जिव लावावे, आणी सर्वांनी रोजगाराकडे वळावे व आर्थिक समृद्ध होत समाधानकारक जिवन जगावे, समाजामधे आपसात कुठलेही मतभेद न ठेवता एक आदर्श जिवन जगावे असे गजानंद बोहरा यांनी सांगीतले.

यावेळी मा.उपसरपंच बद्री चाव्हाण, भाजपा कार्यकर्ता बळीराम वाघ, गणेश मंडळाचे अध्यक्ष जगदीश वाघ, उपाध्यक्ष संदीप वाघ, किशोर घुगे, आकाश आगलावे, मंगेश घुगे, कृष्णा चव्हाण, पवन वाघ, महेश वाघ, दीपक राख, अनिकेत वाघ, सुदर्शन वाघ, अक्षय वाघ, धनंजय वाघ, बद्री वाघ, भरत वाघ, रामेश्वर वाघ, चंद्रकांत सानप, अनिल चव्हाण, शुभम चव्हाण, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.