माजी खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नांना अखेर यश
जालना : संपूर्ण मराठवाड्यासह राज्याच्या गणेश भक्तांचे आराध्य स्थान असलेले जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजुर येथील राजुरेश्वर संस्थानाला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. जालना जिल्ह्यातील राजुरेश्वर म हागणपती हे स्थळ राज्यातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून आधुनिक काळात नावारूपाला आले आहे.येथील मंदिर परिसर अत्यंत भव्य दिव्य असून

यास ऐतिहासिक व पुरातत्व पार्श्वभूमी असल्याने या ठिकाणास दरवर्षी साधारणतः ६८ ते ८३ लाख स्थानिक व ५०० ते ६०० विदेशी भाविक भेट देत असतात त्यामुळे जालना जिल्ह्याचे माजी खासदार व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शासन दरबारी सातत्याने मागणी केली होती की या संस्थानाला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा त्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून या ठिकाणी हवे तेवढी विकास केला आहे यामध्ये भव्य दिव्य असे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आले असून या सर्व मागणीचा प्रस्ताव शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांनी दिनांक २२ फेब्रुवारी २०१६ आणि शासन शुद्धिपत्रक पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग दि. ८ मार्च २०१६ राज्यातील ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ घोषित करण्यासाठी निकष व कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार जालना शहरातील श्रीक्षेत्र राजुरेश्वर महागणपती राजुर तालुका भोकरदन या स्थळास ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.