शेतकरी कर्जमुक्तीसह १७ मागण्यांसाठी प्रहार पक्षाच्या चक्काजाम आंदोलनास शेतकरी संघटनांचा जाहीर पाठिंबा !

शेतकरी कर्जमुक्तीसह १७ मागण्यांसाठी प्रहार पक्षाच्या चक्काजाम आंदोलनास शेतकरी संघटनांचा जाहीर पाठिंबा !

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला, वंचित आणि गरीब घटकांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री मा. श्री. बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली २४ जुलै २०२५ रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला शरद जोशी विचार मंच, शेतकरी कामगार महासंघ फाउंडेशन (भारत सरकार मान्यता प्राप्त), तसेच नवी दिल्लीस्थित शेतकरी संघटना महासंघ यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

शेतकरी कर्जमुक्ती, ऊसाला ₹४४०० प्रति टन, कांद्याला ₹२४१० प्रति क्विंटल, गाईच्या दुधाला ₹४८ व म्हशीच्या दुधाला ₹६० प्रति लिटर हमीभाव यांसारख्या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे संघटनांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. मात्र ३ जुलै रोजी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत. शेतकरी संघटनांनी आरोप केला आहे की सरकार फसव्या घोषणा देत असून, भाजप सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांची फसवणूक व आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर २४ जुलै रोजी महाराष्ट्रात जिथे-जिथे आंदोलन होईल, त्या सर्व ठिकाणी २०० हून अधिक संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी, कष्टकरी व कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने गांभीर्याने निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे. “जय प्रहार, जय महाराष्ट्र, जय किसान, जय संविधान” या घोषणांनी आंदोलन अधिक जोमदार होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *