खुलताबाद{ प्रतिनिधी सविता पोळके}; खुलताबाद नगरपालिकेचे कर्मचारी शेख कलीमोद्दीन तमीजोद्दीन सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवानिवृत्ती समारोप नगरपालिकेचे मुख्याधिकारी विक्रम दराड यांच्या हस्ते पुष्पहार शाल व स्मृतिचिन्ह देऊन निरोप देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश सावजी माजी शहराध्यक्ष मुजीबुद्दीन, कार्यालय अधीक्षक जितेंद्र बोचरे, गणेश पवार, खास पटेल, शासकीय कॉन्ट्रॅक्टर चंद्रकांत चव्हाण, बाबा पटेल आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
