छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : रेणुका महिला विकास सेवाभावी संस्था संचलित शारदा सुमन प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये शिवजयंती अतिशय उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाची सुरूवात शाळेच्या मुख्याध्यापक श्री दहीहंडे तुषार सर (प्राथमिक विभाग) आणि श्रीमती साठे सोनिया मॅम (माध्यमिक विभाग) यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनवर सुषमा यांनी केले.

शिवराय, जिजामाऊली आणि मावळ्यांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी आपल्या सहभागाने कार्यक्रमाला विशेष रंगत दिली. काही विद्यार्थ्यांनी भाषणातून तर काही विद्यार्थ्यांनी नृत्य प्रदर्शनातून आपल्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने हसत खेळत पार पडला, ज्यामुळे सर्व उपस्थितांना एक अद्वितीय अनुभव मिळाला.