पिशोर् : पोलीस स्टेशन हद्दीतील वाकद गावात अत्यंत लाजिरवाणी घटना…. शिक्षक हा एक गुरु असतो पण गुरूच्या नावाला कलंक लावणारे कन्नड वाकद येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेख सर यांनी शिक्षक दिनाच्या एक दिवस अगोदर
रात्री ११:०० वाजेच्या दरम्यान जिल्हा परिषद शाळा वाकद येथे काहीतरी कुजबुज ऐकू आली त्यामुळे गावातील युवकांनी शाळेकडे धाव घेतली असता त्याठिकाणी काही लोक शाळेतील विद्यार्थ्यांचे माध्यान्ह भोजनाचे तांदूळ व इतर साहित्य चोरी करत होते. एका पीकअप गाडीमध्ये हा माल घेऊन ही मंडळी लंपास करत होती. त्याच वेली त्यांना पकडले. सगळ्यात लाजिरवाणी चोरी ही करण्यासाठी खुद्द शाळेचे मुख्याध्यापक शेख सर हे आलेले होते . त्यावेळी पोलिस स्टेशन चे अधिकारी, केंद्र प्रमुख, सरपंच, शालेय नियोजन समिती चे पदाधिकरी, शाळेतील शिक्षक सर्वांसमोर चोरी करणाऱ्या मुख्याध्यापक याला पकडले. गाडी पोलिस सटेशन ला जमा करण्यात आली असून त्या चोर मुख्याध्यापकावर कार्रवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.