शालेय अभ्यासक्रमात आत्मसंरक्षणाच्या धड्याचा समावेश करावा यासाठी आज आझाद मैदान मुंबई येथे जनजागृती आंदोलन करण्यात आले.

शालेय अभ्यासक्रमात आत्मसंरक्षणाच्या धड्याचा समावेश करावा यासाठी आज आझाद मैदान मुंबई येथे जनजागृती आंदोलन करण्यात आले.

मुंबई ; आझाद मैदान मुंबई येथे शालेय शिक्षणात आजपर्यंत शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून कवायत, खेळांचे प्रशिक्षण व इतर शारीरिक शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत परंतु आज कालानुरूप काळाची गरज पाहता अल्पवयीन मुलं-मुली यांच्या बाबतीत घडणाऱ्या अपहरण, विनयभंग, बलात्कार, रॅगिंग यासारख्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे तसेच सध्या राज्यात बदलापुर व कोल्हापूर येथील घडलेल्या घटनेची दाहकता पाहता अभ्यासक्रमात बदल करून सुधारणा करणे काळाची गरज आहे

तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यात कडक शासन होणेसांठी कायदेही कडक करण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने शासनाने आत्मसंरक्षणाचे धडे देण्यासाठी विविध योजना जाहीर केलेल्या आहेत परंतु संघटनेने आज आझाद मैदान मुंबई येथे लाक्षणिक उपोषण व जनजागृती आंदोलन करून अशा पद्धतीचा अभ्यासक्रम शारीरिक शिक्षणात समाविष्ट करावा अशी मागणी केली, कारण लहानपणापासूनच आत्मसंरक्षणाचे धडे मिळाल्यास मुला मुलींचा आत्मविश्वास वाढून भविष्यात अशा घटना पासून स्वतःचे रक्षण करण्याचे बळ त्यांच्यात निर्माण होईल व यामुळे पोलीस प्रशासन व शासन यांच्यावर पडणारा ताणही कमी होईल म्हणून शासन स्तरावर याबाबत तात्काळ निर्णय घेऊन तशा पद्धतीचा अभ्यासक्रम सुरू करावा यासाठी आजपासून विविध पद्धतीने जनजागृती मोहीम राज्यभर राबवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले

. अन्यथा संघटना याबाबत तीव्र आंदोलन छेडेल व प्रसंगी वेळ पडल्यास मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलन करेल व यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील अशा पद्धतीचा इशारा देण्यात आला.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *