फुलंब्री (प्रतिनिधी हेमंत वाघ) : शिवजयंती उत्सवात दारू पिऊन डीजेसमोर नाचणे ही महाराजांची शिकवण नसून, डीजेच्या तालावर नाचण्यापेक्षा पारंपरिक वाद्य वाजवा, असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नांगरे यांनी केले. फुलंब्री येथे नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात शिवजयंती उत्सव व जमालशहा बाबा उरूस उत्सव निमित्त शांतता समितीची बैठक शनिवारी (ता.१५) पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव, पोलिस निरीक्षक संजय सहाने, सहायक पोलिस निरीक्षक सुनील इंगळे, संभाजी वडते, उपअभियंता गणेश साखळे, जमल शहवली बाबा उरूस समितीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविकात नागरिकांनी सण, उत्सवामध्ये कुठलाही गोंधळ न घालता शांततेत सण, उत्सव साजरे करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संजय सहाने यांनी केले. अत्यावश्यक सुविधा पुरवणारजमाल शाहवली बाबा उरूस उत्सवामध्ये स्वच्छता राखण्याची जबाबदारी नगरपंचायत घेत आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक असणाऱ्या सुविधादेखील नगरपंचायत पुरवणार आहे. तसेच, नागरिकांनी सण उत्सवामध्ये वेळोवेळी दिलेल्या सूचनेची अंमलबजावणी करणार असल्याचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी सांगितले.