वैजापूर ; तालुका{ प्रतिनिधी :सविता पोळके } ; स्वच्छता ही सेवा -2024 अभियान पंधरवाडा निमित्त वैजापूर शहरात साजरा करण्यात आळा या वेळी मा.मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.संगिती ललीता डिंगबर नांदुरकर यांचे शासनाच्या नियमानुसार आदेशा प्रमाणे श्री.आर.डी. साठे उपमुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षक श्री.अंकुश रुस्तुम भराड पाटील, नगरपरिषद वैजापूर यांनी व सोबत त्यांचे सहकारी स.स्वच्छता निरीक्षक श्री.प्रमोद निकाळे,व स.स्वच्छता निरीक्षक श्री.विष्णु आलुले,व वैजापूर शहरात आठ झोन वाईज मुकादम व स्वच्छता कर्मचारी, शहरात स्वछता ही सेवा -2024 अभियान पंधरवाडा अभियान राबविले

नगरपरिषदेच्या 19 शाळा असुन शाळेचे प्रवेषक श्री.एम आर गणवीर सर, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शाळेत, स्वच्छता विषयक, सांस्कृतिक कार्यक्रम, सायकल रॅली, रांगोळी स्पर्धा, स्वच्छता रॅली, मानवी साखळी,असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहे.व स्वच्छता मित्र सर्व स्वच्छता कर्मचारी यांचे वैद्यकीय तपासणी भगवान महावीर नगरपरिषद दवाखाना, येथे दि.30/09/2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे तसेच वैजापूर शहरात ओला कचरा व सुका कचरा, 95 % वर्गीकरण केला जातो तसेच घातक कचरा व इतर कचरा सर्व वेगवेगळा करुन त्या कचरा पासुन सेंद्रीय खत तयार करण्यात येते… स्वछता ही सेवा आहे अशी विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली तसेच वेगवेगळ्या शाळेमर्फत रॅली काढण्यात आली त्याचबरोबर प्रत्येक शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या..

यावेळी नगरपरिषदच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. संगिती ललिता दिगंबर नांदुरकर, उपमुख्याधिकारी श्री. आल. डी. साठे, स्वछता निरीक्षक श्री. अंकुश रुस्तुम भराड पाटील, सह सर्व अधिकारी, कर्मचारी व प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शालेय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.