वैजापूर (प्रतिनिधी) : शहरात आठवड्याभरात चार
मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. लाखो रुपयांची दागदागिने व रोख रकमेवर भर दिवसा चोरट्यांनी हात साफ केला. परंतु एकाही प्रकरणाचा उलगडा वैजापूर पोलिसांकडून अद्याप पर्यंत झालेला नाही.
यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. एरवी अंधाराचा फायदा घेत चोऱ्या करणारे चोरटे भरदिवसा उजेडात खुलेआम चोऱ्या करीत असल्याने वैजापुरात पोलिसांचा धाक संपला की काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे दाग
दागिने घालून घराबाहेर पडणे महिलांसाठी धोक्याचे ठरत असून महिला वर्गामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशा धिंडवडे निघाले असून शहरातील नागरिकांना असुरक्षित वाटू लागल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. चोरी झाल्यानंतर गुन्हे
दाखल होतात अन दिवसेंदिवस तपासाचे गुन्हाळ सुरूच राहते व काही दिवसानंतर फाईल बंद होते अशी खुलेआम चर्चा आता नागरिक शहरात करताना दिसून येतात. पोलिसांना चोरटे सापडत नसल्याने चोरीची तक्रार देणारे तक्रारदार कंगाल अन चोरटे मालामाल अशी परिस्थिती सध्या
या भागात घडल्या घटना ?
- सात लाख पंधरा हजार रुपयांचे दाग दागिने व रोख चोरीच्या घटना
- गंगापूर चौफुली येथून फोर व्हीलर गाडीमध्ये बसत असताना सुवर्णमाला गायकवाड
रा. जालना यांच्या गळ्यातील तीन लाख वीस हजार रुपयांचे दागिने लंपास.
■ मारवाडी गल्लीतील जैन मंदिरासमोरून प्रमिला पाटणी रा. वैजापूर या वृद्ध महिलेच्या गळ्यातील एक लाख वीस हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरी. ■ पंचायत समिती समोरून मोटर सायकल ला लटकवलेली अडीच लाखाची नवनाथ बोर्ड रा. हिलालपूर यांची बॅग चोरांनी पळवली. • वैजापूर बस स्थानकातून सव्वा लाख रुपये किमतीचे वैशाली कदम रा. सबंदगाव यांचे सोन्याचे गंठण लंपास. - ■ तपासाची गती काय आह?
- चोरीच्या घटनांची उकल करण्यात वैजापूर पोलीस सपशेल अपयशी ठरत असल्याने चोरट्यांचा मात्र आत्मविश्वास वाढला आहे. या चोरीच्या घटनांच्या तपासाची गती काय आहे ? हे जाणून घेण्यासाठी दैनिक सांजवार्ता प्रतिनिर्थीनी मोबाईल क्रमांकावरून पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्याशी दोनदा संपर्क साधला असता त्यांनी कसला ही प्रतिसाद दिला नाही.
- ■ पोलिस प्रशासनाकडून आवाहन सध्या शहरात शिव महापुराण कथा ऊर्स सुरू असल्याने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महिलांनी घराबाहेर पडताना आपले दाग दागिने सांभाळण्याचे
- आवाहून करण्यात आले आहे.
- वैजापुरत बघायला मिळत आहे.