वैजापुरात नियुक्ती असणारा पोलिस कर्मचारी निलंबित

वैजापुरात नियुक्ती असणारा पोलिस कर्मचारी निलंबित

वैजापूर (प्रतिनिधी)दोन महिन्यांसाठी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करूनही कर्तव्यावर हजर न झाल्यामुळे पोलिस कर्मचारी साहेबराव बाबुराव इखरेला निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी मंगळवारी उशिरा याबाबत आदेश जारी केले. तसेच अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनादेखील निवडणुकीच्या काळात कसूर केल्यास कठोर कारवाईचा इशारा अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिला. ग्रामीण अधीक्षक मनीष कलवानिया व जिल्हाधिकारी यांनी नुकतीच जिल्ह्यातील सुरक्षा व कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत. प्रामुख्याने निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्यास कठोर कारवाई केले जाईल, अशी ताकीद दिली होती. जिल्हा पोलिस दलाच्या दंगा काबू पथकातील पोलिस नाईक साहेबराव बाबुराव इखरेला यांची वैजापूर येथील निवडणूक निवडणुकीच्या कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली होती. वरिष्ठांना काहीही न कळवता कर्तव्यावर गैरहजर राहिल्याची बाब कलवानिया यांना कळतात त्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.दरम्यान, एकीकडे अधीक्षक मनीष कलवानिया वैजापुरात नियुक्ती असणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करतात व याची साधी भनकही उपविभागीय अधिकारी महक स्वामींना लागू नये आश्चर्याची बाव म्हणावी लागेल. असा कुठलाही कर्मचारी निलंबित झालेला नाही. ती फक्त पत्रकारांच्या ग्रुपवरील चर्चा आहे. महक स्वामी, उपविभागीय पोलिस अधिकारी निवडणुकीच्या कामात हयगय केल्याने कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले. मनीष कलवानिया, पोलिस अधीक्षक ग्रामीण

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *