विसर्जन मिरवणुकीत हुल्लडबाजी.दगडफेक करणारे सहा जण अटकेत पुंडलीकनगर येथील घटना

विसर्जन मिरवणुकीत हुल्लडबाजी.दगडफेक करणारे सहा जण अटकेत पुंडलीकनगर येथील घटना

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी): गणेश विसर्जन मिरवणुकीत दारू पिऊन महिलांच्या अंगावर गुलाल टाकणाऱ्या हुल्लडबाजी करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली. पुंडलीकनगर परिसरात मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर जवळपास १५ ते १७ जणांवर पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त नवनीत कॉवत यांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, पुंडलीक नगर भागात रात्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू होती. पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या मिरवणुकीत काही हुल्लडबाज तरूण मिरवणुकीत शिरले. त्यांनी गोंधळ सुरू केला. काही महिला तरूणींच्या अंगावर या हुल्लडबाजांनी गुलाल टाकला. त्यामुळे संतप्त तरूणांनी त्यांना अडवले. या दारूड्या तरूणांनी दगडफेक सुरू केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थ

दरम्यान मिरवणुकीत गोंधळ झाल्याची माहिती होताच पोलिस उपायुक्त नवनीत कॉवत यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. हुल्लडबाज तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील सहा हुल्लडबाजांना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर १७ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तर तडीपार करणार : पोलिस उपायुक्त कॉवतगणेशोत्सव आनंदात साजरा करण्याचा उत्सव आहे. या उत्सवाचा आनंद घ्यावा हे अपेक्षित आहे. त्या मिरवणुकीत दारू पिऊन धिंगाणा घालणे योग्य नाही. या हुल्लडबाजांना तात्काळ ताब्यात घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. यापुढे असा प्रकार घडला तर आरोपींना तडीपार करण्यात येईल असा इशाराही पोलिस उपायुक्त नवनीत कॉवत यांनी दिला.दरम्यान नवीन शहर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे यांनी राष्ट्रगीत लावून शांततेसाठी सहकार्य केले.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *